रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे हे येत्या 4 मे रोजी कणकवलीत प्रचारसभा घेणार.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे हे येत्या 4 मे रोजी कणकवलीत प्रचारसभा घेणार आहेत.ठाणे व मुंबईतही राज ठाकरेंच्या सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, सोमवारी पुण्यातील पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभेत अमित ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते. कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर ही सभा होणार असून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या सभेची तयारी सुरू केली आहेwww.konkantoday.com