रत्नागिरी पोलिसांच्या कालबाह्य झालेल्या वाहनांचा लिलाव होणार
रत्नागिरी पोलिसांच्या कालबाह्य झालेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. यात ४ पोलीस व्हॅन, २ जिप्सी गाड्या, तर १४५ दुचाकींचा समावेश आहे. लिलावाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या गाड्या रत्नागिरी बॉम्बशोध पथकाच्या जागेत ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.शासनाकडून पोलिसांना आपल्या कामकाजासाठी गाड्यांचा पुरवठा केला जातो. यामध्ये पोलीस व्हॅन, जिप्सी कार, दुचाकी आदींचा समावेश असतो. ठराविक किलोमीटर रनिंग झाल्यानंतर या सर्व गाड्या कालबाह्य ठरवून वापरातून बाहेर काढल्या जातात. या गाड्या आता भंगारात काढण्यात आल्या असून संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर या गाड्यांचा एकत्रित लिलाव करण्यात येतो. पोलिसांकडे मागील काही वर्षात गस्तीसाठी तसेच वाहतूक पोलिसांना दुचाकी देण्यात आल्या होत्या. या दुचाकीदेखील आता कालबाह्य झाल्या आहेत. त्यांचाही लिलाव केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. www.konkantoday.com