
रत्नागिरीमध्ये किरण सामंत यांच्या कार्यालयावरील उदय सामंत यांचे बॅनर हटवल्याची मोठी माहिती
रत्नागिरीमध्ये किरण सामंत यांच्या कार्यालयावरील उदय सामंत यांचे बॅनर हटवल्याची मोठी माहिती समोर येत आहे.उदय सामंत नाही तर किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लागणार असल्याची भूमिका किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यामुळे कोकणात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे.
किरण सामंतांच्या कार्यलयावरील उदय सामंताचा फोटो आणि बॅनर हटवण्याता आला आहे. किरण सामंतांच्या कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर नेमके का हटवण्यात आले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
किरण सामंत संपर्क कार्यालय अशा आशयाचं पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रत्नागिरी शहरातील प्रसार माध्यमांच्या ग्रुपवर हे पोस्टर व्हायरल होत आहे. किरण सामंत यांचा याला दुजोरा आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची सर्वत्र चर्चा होती. त्यानंतर ते महायुतीच्या प्रचारसभेत दिसल्याने वाद निवळल्याचं दिसून आलं होतं. मात्र, आज पुन्हा किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी मन की बात अशा आशयाचे स्टेटस ठेवल्याचं पाहायला मिळालं. यातूनच सध्या कोकणच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं समोर आलं आहे.
किरण सामंत हे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण त्यांना लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे ते काहीसे नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यांचे कार्यकर्तेही यामुळे नाराज होते. मात्र आपण पक्षासाठी काम करणार असं किरण सामंत यांनी सांगितलं होतं. पण, आता किरण सामंत यांची नेमकी भूमिका काय असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे.
www.konkantoday.com