मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली येथे उड्डाणपूलाचे काम युद्ध पातळीवर सुरू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली येथे उड्डाणपूलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर स्थानिकांची धुळीच्या त्रासातून लवकरच मुक्तता होणार आहे. मे अखेर या उड्डाणपूलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना आरवली बाजारपेठेतून जाणाऱ्या महामार्गात उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील काही महिन्यापासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मातीचा भराव टाकून उड्डाणपूल उभारला जात आहे. आरवलीतील नागरिकांना तसेच बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना दोन्ही बाजूने ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. भुयारी मार्ग करताना मातीचा मोठयाप्रमाणावर वापर झाला आहे. उड्डाणपुलाच्या भरावासाठी लागणारी माती इतर ठिकाणाहून डंपरने येथे आणण्यात आली आहे. त्यामुळे रात्री आणि दिवसा मातीची वाहतूक सुरू होती. त्यामुळे मातीचा आणि धुळीचा येथील विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.www.konkantoday.com