
माजी आमदार रमेशभाई कदम व रसई अलवी यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार शकील सावंत यांच्यावतीने तक्रार दाखल
महाविकास आघाडीचे नेते, माजी आमदार रमेशभाई कदम व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष रईस अलवी यांच्याविरोधात धार्मिक, प्रक्षोभक व धमकींच्या विधानासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे तक्रार दिली असून या प्रकरणी दोघांवर कारवाई होईल, अशी आमची खात्री आहे. अशी माहिती कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष ऍड. ओवेस पेचकर व उमेदवार शकील सावंत यांनी सोमवारी चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी ऍड. ओवेस पेचकर यांनी महाविकास आघाडीकडून अपक्ष उमेदवार सावंत यांच्याबाबत होणार्या अपप्रचाराचाही पुरेपूर समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडी अथवा महायुतीचे एकही मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. महाविकास आघाडी संविधानावर बोलले, परंतु हेच लोक मुस्लिम समाजातील उमेदवार न देता संविधानाची पायमल्ली करीत आहेत. त्यांना संविधानाचे काहीही देणे-घेणे पडलेले नाही. मुस्लिम समाजाची यांना मते फक्त हवी असतात. मग उमेदवार नकोत, असे का? मुस्लीम समाजात शकील सावंत जन्माला आले हा त्यांचा गुन्हा आहे का? असा सवाल करीत आम्ही धर्म, जात-पात यांच्या नावावर मते मागत नसून विकासाच्या मुद्यांवर राजकारण करत असल्याचेही ऍड. पेचकर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघातून कोकण प्रादेशिक पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी शकील सावंत यांची १२ जानेवारीस उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी प्रथम अपक्षक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. www.konkantoday.com