मत्स्य संशोधनात शंभर टक्के योगदान द्या- कुलगुरू डॉ. संजय भावे
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी व मत्स्य विषयक संशोधनात संशोधन केंद्राचा वाटा हा महत्वाचा असून त्या अनुषंगाने सर्व शास्त्रज्ञ वर्गाने जीवंत मत्स्य वाहतूक सुविधा, मत्स्य प्रयोगशाळा, मत्स्य पिंजरा प्रकल्प सुविधांच वापर करून यासंबंधीचा शंशोधनात आपले शंभर टक्के योगदान द्यावे असे आवाहन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्रात जिवंत मत्स्य वाहतूक सुविधा, जलीय मत्स्य प्रयोगशाळा, मत्स्य पिंजरे या संशोधन सुविधांचे अनावरण आणि फिश फिडर पेटंट प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी विद्यापीठा अंतर्गत खार जमीन संशोधन केंद्रास प्राप्त झालेले मत्स्य फिडर पेटंटचे प्रकाशन कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले.www.konkantoday.com