
पुणे येथे युवा योग फेस्टीव्हलमध्ये राज्यस्तरीय योग स्पर्धेत प्रिया पवार प्रथम
महाराष्ट्र योगमित्र ऍण्ड सोशल असोसिएशन मुकुंद व्यायाम शाळातर्फे पुणे येथे युवा योग फेस्टीव्हलमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेमध्ये वयोगट ४ ते ६ पासून ४५ वर्षे वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेमध्ये कोवॅस व्यायाम शाळा, चिपळूण येथील सर्व स्पर्धकांनी बाजी मारली. त्यातील प्रिशा सुरेश पवार हिने ४ ते ६ वयोगटामध्ये अव्वल स्थान मिळवले. तिने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व उपस्थित परीक्षक यांनी तिचे कौतुक केले व शाबासकी दिली. यासाठी तिला कोवॅस योगशिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.www.konkantoday.com