नवीन संस्कारक्षम पिढी तयार व्हावी यासाठी पालकांनी सजग व्हावं. सरपंच सतिश थुळ
रत्नागिरी: १ में २०२४ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडी, जि. प.आदर्श मराठी शाळा सत्कोंडी , ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय व ॲक्टिव्ह फ्रेंड्स सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी आयोजित कार्यक्रमात ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडी सरपंच सतिश थुळ हे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, नवीन संस्कारक्षम पिढी तयार व्हावी यासाठी पालकांनी सजग व्हावं. कार्यक्षेत्रातील शाळांच्या प्रगतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचाही नावलौकिक वाढत असतो. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत पन्हळी गावचे सुपुत्र माजी ग्रा. पं. सदस्य अनिल बैकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर जि. प. आदर्श मराठी शाळा सत्कोंडीच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थी व तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या स्वंयसेविका गीता मोरे यांचा निरोप समारंभ पार पडला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ वर्षांचा वार्षिक निकालपत्र व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सतिश थुळ, ग्रामपंचायत सदस्य अरुण मोर्ये, अजय काताळे , ममता बंडबे, समिक्षा घाटे, निकिता शिगवण, ग्रामसेवक श्रीकांत कुळ्ये, पोलिस पाटील श्रीकांत खापले, नितीन बैकर , अनिल बैकर, ग्रामस्थ उपस्थित होते.