दापोली तहसिलच्या आवारात १०० फूट ध्वजस्तंभ उभा राहिला परंतु अजूनही तिरंगा फडकला नाही
दापोली तहसिल कार्यालयाच्या आवारात सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या १०० फूट ध्वजस्तंभावर १ मे रोजी तरी तिरंगा फडकविण्यात येणार का, असा सवाल दापोलीतील नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाला केला जात आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील तहसिल कार्यालय आवारात १०० फुटी ध्वजस्तंभ उभारण्यात आले आहेत. १५ ऑगस्ट २०२३ च्या अगोदर ८ दिवस दापोली तहसिल कार्यालयाच्या आवारात सुमारे ३३ लाख रुपये खर्च करून ध्वजस्तंभ उभारण्याात आला असून १४ ऑगस्ट २०२३ रोजी तिरंगा फडकविण्याची चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे दापोलीकर नागरिकांना या ध्वजस्तंभावर १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकविला जाईल, असे वाटत होते. मात्र कोठेतरी माशी शिंकली व तिरंगा काही फडकविण्यात आला.www.konkantoday.com