चिपळूण शहरातील मुरादपूर येथे अचानक आग, आग आटोक्यात आणण्यात यश
चिपळूण शहरातील मुरादपूर येथील कोकण आंगणच्या मागील बाजूस सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. खुल्या मैदानातील झाडी-झुडपांनी पेट घेत ही आग वस्तीच्या जवळ पोहोचल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच चिपळूण नगर पालिकेतील अग्निशमन विभागातील जवानांनी तातडीने अग्निशमन बंबासह घटनास्थळी धाव घेत तेथील आग आटोक्यात आणली. वेळीच आग विझल्याने मोठा अनर्थ टळला. www.konkantoday.com