
मुरूगवाडा परिसरात प्लास्टिक व कचर्याचा ढीग निर्मल सागर तट अभियान थंडावले
महाराष्ट्र सागरी महामंडळाच्यावतीने निर्मल सागर तट अभियान आठ वर्षापूर्वी राबवण्यात आले होते. या अभियानास नागरिकांना चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला होता. परंतु सध्या रत्नागिरीतील मुरूगवाडा पांढरा समुद्रकिनारी साचलेला प्लास्टीक आणि इतर कचरा पाहता या अभियानाचा विसर महाराष्ट्र सागरी मंडळाला पडल्याचे दिसून येते. येथे साचलेल्या प्लास्टिक कचर्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यालय आहे.निर्मल सागर तट अभियान हाती घेताना शासनाने परिवहन, पर्यटन आणि पर्यावरण हे तीन प विचारात घेतले होते. त्यादृष्टीने सागरी विकासाच्या विविध योजना गेल्या काही वर्षात हाती घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी निधीची तरतूददेखील करण्यात आली आहे. परंतु परिवहन, पर्यटन आणि पर्यावरण हे तीन घटक एकमेकांस पूरक असताना रत्नागिरी शहराला लाभलेल्या किनारपट्टीच्या स्वच्छतेकडे सागरी महामंडळाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. www.konkantoday.com




