
निकालापूर्वीच रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या विजयाचे बॅनर झळकले
लोकसभेचा निकाल चार जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र, निकालापूर्वीच रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, या बॅनरवर अनंत गीते यांचा भावी केंद्रीय मंत्री म्हणून उल्लेख देखील करण्यात आला आहे.या बॅनरवर लिहिलं आहे, ‘अनंत गीते साहेब बहुमताने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन!’ तसेच या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा फोटो लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. तर लोकसभेचा निकाल लागायला अजून आठवडा बाकी आहे. अशातच ठाकरे गटाकडून रायगडमध्ये बॅनरबाजी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही शिवसैनिकांनी माणगाव तालुक्यात गोरेगाव बस स्थानक परिसरात गीते यांचे बॅनर लावले आहेत.www.konkantoday.com




