लांजा तालुक्यातील कुरचुंबे येथे मधमाशांच्या हल्ल्यात वृद्ध जखमी
लांजा तालुक्यातील कुरचुंबे येथे मधमाशांच्या हल्ल्यामध्ये वृद्ध जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश शिवराम पाटोळे (६५, रा. कुरचुंबे, जाधववाडी, ता. लांजा) असे जखमीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा कुरचुंबे गावातील श्री गांगेश्वर मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने गावकर्यांकडून साजरा करण्यात येत होता. या कार्यक्रमासाठी २९ एप्रिल रोजी सकाळी प्रकाश पाटोळे व चंद्रकांत जाधव हे गेले होते. महाप्रसादाचे जेवण करण्यासाठी प्रकाश पाटोळे यांनी मंदिराजवळच चूल मांडली. धुराने मधमाशांचे पोळे उठले. यातून निघालेल्या मधमाशांनी प्रकाश पाटोळे यांच्यावर हल्ला केला. पाटोळे यांच्या सर्व अंगावर मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.www.konkantoday.com