रेल्वेतील पदार्थ खाताना सावध रहा,गोरखपूर एक्सप्रेसमधून प्रवास प्रवास करणाऱ्या प्रवाशानी अंडा बिर्याणी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा
* रेल्वेतील अंडा बिर्याणीतून झालेल्या विषबाधा प्रकरणाने मध्य रेल्वे प्रशासनाला चांगलाच हादरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, येथील शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडून इंडियन रेलवे कैटरिंग एंड टूरिज्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली असून, त्यांना या संबंधाने विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.शुक्रवारी सकाळी यशवंतपूर गोरखपूर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या ज्या प्रवाशांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या कॅटरिंगमधून पुरिवण्यात आलेली अंडा बिर्याणी खाल्ली अशा ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. ईटारसीजवळ प्रवाशांना पोटदुखी, मळमळ, ओकाऱ्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर प्रवाशांमध्ये खळबळ निर्माण झाली. त्यानंतर कानपूर, झांसीमधून प्रवाशांवर उपचार सुरू झाले. दरम्यान, प्रवाशांना चांगल्या दर्जाचे खाद्य पदार्थ दिल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात असताना या दाव्याची अशा पद्धतीने वाट लागल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाला चांगलाच हादरा बसला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली जावी, अशीही मागणी केली जात आहे.www.konkantoday.com