रायगड- खोपोली येथील दरोडा प्रकरणातील तिघांना सावंतवाडीत अटक

रायगड-खोपोली येथे दरोडा टाकून फरार झालेल्या तिघा आरोपींना सावंतवाडीतील एका हॉटेलच्या परिसरातून रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन ते साडेतीन लाख रूपयांची रोकड आढळून आल्याची चर्चा आहे. खोपोली-रायगड जिल्ह्यातून दरोडा घालून आरोपी फरार झाले होते. या आरोपीचा शोध घेण्यासाठी रायगड पोलिसांकडून पथके तैनात करण्यात आली होती. त्यातील काही आरोपी हे सावंतवाडीत परिसरात असलेल्या एका हाॅटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रायगड पोलिसांचे एक पथक गेले दोन दिवस सावंतवाडीत ठाण मांडून होते. त्यानंतर रायगड पोलिसांनी सावंतवाडी येथील हाॅटेलच्या परिसरातून सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने यातील तिघांना ताब्यात घेतले. हि कारवाई सोमवारी (दि.२९) रात्री उशिरा करण्यात आली. मात्र याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यातून दुजोरा देण्यात आला आहे. तरी याबाबत गुप्तता पाळण्यात आली. त्यामुळे संशयितांची नावे समजू शकली नाहीत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button