यंदा मान्सूनची लवकरच एन्ट्री होण्याची शक्यता
राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढली असून नागरिक हैराण झाले आहेत आता लवकरच उकाड्यापासून सुटका होणार आहे, यंदा मान्सूनची लवकरच एन्ट्री होण्याची शक्यता आहे. मान्सून अंदमानमध्ये येण्यास २१ दिवस बाकी आहेत. समुद्रावर सध्या ८५० हेक्टा पास्कल इतका दाब आहे.त्यामुळे मान्सून केरळमध्ये वेळेआधीच येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.हवेचा दाब देतोय मान्सूनची वर्दीहवेचा दाब यंदा मान्सून लवकर येण्याची वर्दी देत आहे. यंदा प्रचंड उष्णतेच्या लाटांमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीस अनुकूल झाला असून सध्या हा दाब 700 वरून 850 हेक्टा पास्कलवर गेल्याने मान्सूनच्या हालचालीचे संकेत मिळाले आहेत.मान्सूनची हालचाल आणि नंतरची सर्व प्रगती ही हवेच्या दाबावर अवलंबून असते. हवेचा दाब हा समुद्रावर 1000 हेक्टा पास्कलवर गेला की मान्सूनची निर्मिती सुरू होते. हवेचा दाब 1006 वर गेला की, मान्सून अंदमानात दाखल होतो. पुढे हा दाब 1008 वर गेला की, तो भारतात केरळ किनारपट्टीवर येतो. यंदा हवेचा दाब मान्सूनसाठी लवकर अनुकूल होत आहे, असे निरीक्षण हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात येण्यास अवघे 21 दिवस उरले आहेत. दरवर्षी मान्सून 18 ते 20 मेदरम्यान अंदमानात येतो. त्यानंतर हवेचा दाब अनुकूल झाला तर यंदा वेळेआधीच तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी यंदा दिला आहे.www.konkantoday.com