
निवडणूक प्रशिक्षक्षणादरम्यान कर्मचार्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रशिक्षक्षणादरम्यान कर्मचार्यांना मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेले तीन दिवस सुरू असलेले हे प्रशिक्षण आणि कर्मचार्यांच्या मतदानासाठी ३० एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. ज्यांना आज मंगळवारी मतदान करता येणार नाही, अशा कर्मचार्यांना ६ आणि ७ मे रोजी टपाली मतदान करता येणार आहे.निवडणूक कार्यक्रमातून कुणीही वगळले जावू नये, यासाठी निवडणूक विभागाने वेगवेगळ्या सुविधा मतदारांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. याचाच एक भाग म्हणजे जे शासकीय कर्मचारी निवडणूक कामात सहभागी आहेत, अशांसाठी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या ठिकाणीच टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.www.konkantoday.com