दक्षिण मुंबईचा तिढा आता सुटला असून महायुतीकडून शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा
* राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या लढतीपैकी एक असलेल्या दक्षिण मुंबईचा तिढा आता सुटला असून महायुतीकडून शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे.त्यामुळे आता यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत असे एकेकाळचे सहकारी आणि सध्या वेगवगेळ्या पक्षात असलेले दोन शिवसैनिक एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे.दक्षिण मुंबईची जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार की भाजपला जाणार यावर बरीच चर्चा झाली. या जागेसाठी भाजपचा आग्रह होता. त्यामुळेच भाजपचे राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकरांनी प्रचाराला सुरूवात केल्याने ही जागा भाजपलाच जाणार अशी चर्चा होती. पण आता शिवसेना शिंदे गटाने ही जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवल्याचं दिसतंय.www.konkantoday.com