जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात, काजूचे सरासरीच्या ३० टक्केच उत्पादन, व्यावसायिकांचा अंदाज
रत्नागिरी जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सरासरीच्या ३० टक्केच उत्पादनाचा अंदाज आहे. उत्पादन कमी असले तरी काजू बीचा दर ११० रुपयांवरच स्थिर आहे. यापुढे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नसल्याचे व्यापार्यांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात या वर्षी जानेवारीपासून काजू हंगामाला सुरूवात झाली. किनारपट्टी भागात जानेवारीच्या अखेरीस हंगाम सुरू झाला.www.konkantoday.com