केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्या प्रकरणी दोन जणांना अटक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्या प्रकरणी गुजरात पोलिसांनी काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांचे स्वीय सहाय्यक ( पीए) सतीश वनसोला आणि आपच्या कार्यकर्त्यासह दोघांना अटक केली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ 2 फेसबुक प्रोफाइलवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रकरणी आम्ही कलम 505A, 1B, 469, 153A आणि IT कायदा अंतर्गत गुन्डहा दाखल केला आहे. एक फेसबुक प्रोफाईल सतीश वनसोला याच्या नावावर असून, या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.’www.konkantoday.com