
अनंत गीतेंनी किती कारखाने आणले एकदा जाहीर करावे, खा. सुनील तटकरे यांचे अनंत गीते यांना आव्हान
अनंत गीते केंद्रामध्ये एवढी वर्ष उद्योगमंत्री राहिले पण त्यांनी कोकणामध्ये किती उद्योग आणले? किती लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला? हे एकदा स्वतःच जाहीर करावे. कुणबी समाज बांधवांना प्रत्येक निवडणुकीत गृहित धरून कुणबी समाजाच्या जीवावर निवडून येणार्या गीते यांचे समाजासाठी काय योगदान दिले, असा सवाल रायगड लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी करीत महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा समाचार घेतला.चिपळूण तालुक्यातील पालवण येथे खा. सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. तटकरे यांनी सभेला संबोधित करताना माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.www.konkantoday.com




