1 मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
रत्नागिरी, (जिमाका) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता येथील पोलीस परेड ग्राऊंडवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8 वाजता असल्यामुळे इतर कार्यालय अगर संस्था यांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 7.15 वा. पुर्वी किंवा सकाळी 9 वा. च्या नंतर करावा. या मुख्य शासकीय समारंभासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.