रत्नागिरीच्या समुद्रात भरकटलेला तामिळनाडूचा ट्रॉलर सुखरूप किनारी
रत्नागिरीच्या समुद्रात २० नॉटीकल मैलावर तांत्रिक बिघाडामुळे अडकलेला तामिळनाडूचा मच्छिमारी ट्रॉलर स्थानिक मच्छिमार व तटरक्षक दलाच्या मदतीने रत्नागिरीच्या मिर्याबंदर येथे सुखरूपरित्या आणण्यात आला.अचानक इंजिन बंद पडल्याने या बोटीवरील १४ मच्छिमारांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.उपलब्ध माहितीनुसार सदर ट्रॉलर तामिळनाडू येथून मासेमारीसाठी रत्नागिरी समुद्रात आला होता. समुद्रात २० नॉटीकल अंतरात मासेमारी करत असताना या ट्रॉलरचे इंजिन अचानक बंद पडले. त्यामुळे ट्रॉलर समुद्रात भरकटू लागला. त्यामुळे या ट्रॉलरवर काम करणार्या १४ मच्छिमारांचा जीव धोक्यात आला. दरम्यान, स्थानिक मच्छिमार व तटरक्षक दलाच्या ही बाब निदर्शनास आली. तटरक्षक दलाकडून व मच्छिमारांच्या सहाय्याने ट्रॉलरचा तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.www.konkantoday.com