महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठीमंत्री रवींद्र चव्हाण ३० एप्रिलला रत्नागिरीत
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे निवडणूक निरीक्षक रवींद्र चव्हाण आणि रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उद्या मंगळवारी ३० एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी झंझावाती दौरा, सभा करणार आहेत. खंडाळा, हातखंबा, कोळंबे, रत्नागिरी शहरात सभा होणार आहेत.३० एप्रिलला सकाळी १०.३० वाजता केंद्रिय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रत्नागिरी उदय सामंत यांच्यासह मंत्री चव्हाण खंडाळा येथील सर्वसाक्षी हॉल येथे सभेत संवाद साधणार आहेत. दुपारी १२.३० वाजता हातखंबा येथील सिंधीगिरी मंगल कार्यालयात सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता कोळंबे फाटा येथे उमेदवार नारायण राणे यांच्यासमवेत मंत्री चव्हाण, मंत्री सामंत सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता शांतीनगर येथील बालाजी मंगल कार्यालयात सभेचे आयोजन केले आहे. यामध्ये मंत्री चव्हाण मार्गदर्शन करतील. उमेदवार नारायण राणे आपली विकासात्मक भूमिका मांडणार आहेत.या सभा झाल्यानंतर मंत्री चव्हाण सिंधुदुर्गकडे रवाना होणार आहे. १ मे सकाळी ७.४५ वाजता महाराष्ट्र दिनी पोलिस परेड ग्राऊंड सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, कुडाळ येथे शासकीय कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता ते सिंधुदुर्गमधून रत्नागिरीत येणार आहेत. सकाळी ११.३० वाजता हॉटेल मथुरा येथे श्री. चव्हाण यांचे आगमन व राखीव वेळ ठेवला आहे.