कबुतरांना दाणे टाकण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसची चावी देत नसल्याच्या रागातून वाॅचमनचा खून, पोलीस तपासात कारण उघड

कबुतरांना दाणे टाकण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसची चावी देत नसल्याच्या रागातून वाॅचमनचा लाकडी दांडका आणि दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.अशोक महादेव वाडेकर (६०) असे खून झालेल्या वॉचमनचे नाव असून रत्नागिरीतील जेल रोड ते गवळीवाडा जाणार्‍या रस्त्यावरील रेगे कंपाउंडमध्ये शनिवारी (दि.२७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी काही तासातच वेदांत चंद्रकांत आखाडे (21,रा.गणेश कृपा,जेलरोड,रत्नागिरी) या संशयिताला ताब्यात घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.वेदांत आखाडेचा यापूर्वी तीन ते चार वेळा अशोक वाडेकर या वॉचमनशी तो राहत असलेल्या गणेश कृपा बिल्डिंगच्या टेरेसची चावी न देण्याच्या कारणावरुन वाद झालेला होता. वेदांत बिल्डिंगच्या टेरेसवर कबुतरांना दाणे टाकायचा. परंतू कबुतरे त्याठिकाणी घाण करत असल्यामुळे सोसायटीने त्याला चावी न देण्याबाबत वॉचमन अशोक वाडेकर यांना सांगितले होते. त्यामुळे वाडेकर वेदांतला टेरेसची चावी देत नव्हते. याचा राग मनात धरुन त्याने शनिवारी सायंकाळी वाडेकर यांच्यावर पाळत ठेवली होती. शनिवारी सायंकाळी वाडेकर रेगे कंपाउंडमधून घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून जात त्याने लाकडी दांडक्याने आणि त्यानंतर दगडाने ठेचून त्यांचा निर्घूण खून केला.याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन तपास सुरु केला. पोलिसांनी गणेश कृपा बिल्डिंगचे सीसीटिव्ही फूटेज तपासले असता त्यांना त्या बिल्डिंगमध्येच राहणारा वेदांत बिल्डिंगमध्ये शिरताना दिसून आला. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली. दरम्यान, रविवारी वेदांतला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button