अजूनही अनेक ठिकाणी बालमजुरीची प्रथा सुरूच, जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे
सध्याच्या काळात बालमजुरांना कामावर ठेवणार्यांना दंड व शिक्षा करण्यात येत असली तरी अजूनही अनेक ठिकाणी बालमजुरीची प्रथा सुरूच आहे. भारतात वीस कोटींच्या आसपास बालमजूर असल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी दिली. बालमजुरी रोखण्यासाठी सर्वांनी जनजागृती करण्याचे आवाहन करताना आठ कोटी बालके तस्करीसाठी स्थलांतरित केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती, वकिल संघ व रिगल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढे रिगल कॉलेज येेथे नुकतेच शिबीर पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, आजही कारखाने, हॉटेल, विट, भट्टी, कोळसा खाणी या ठिकाणी बालमजूर काम करताना दिसतात. जागतिक कामगार संघटनेच्या सर्व्हेक्षणानुसार पाच ते सहा वयोगटातील बालमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून भारतात ती वीस कोटीच्या आसपास आहे. सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीनुसार आर्थिकदृष्ट्या अविकसित राज्यात बालमजुरांची संख्या अधिक आहे. www.konkantoday.com