लोकअदालतच्या तारखांमध्ये बदल
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून आयोजित करण्यात येणार्या लोकअदालतीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. ५ मे २०२४ व १४ सप्टेंबर २०२४ रोजी होणार्या राष्ट्रीय लोअकदालत आता अनुक्रमे २७ जुलै २०२४ व २८ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहेत. हा बदल राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी व ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोक अदालतमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव निखिल ग. गोसावी यांनी केले आहे. www.konkantoday.com