मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिकांचा निवडणुकीवर बहिष्कार
आरटीओकडून मुक्त रिक्षा परवाना धोरणाचा अवंब केला जात असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षांची संख्या दुप्पट झाली आहे. त्याचा फटका बेरोजगार तरूणांनाा बसत आहे. यासंदर्भात प्रशासन, शासनस्तरावर पत्रव्यवहार करूनही हे धोरण अद्याप बंद करण्यात आलेले नाही. शासनदरबारी सनदशीर मार्गाने न्यायासाठी लढा उभारूनही दखल घेतली जात नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. मुक्त रिक्षा परवाना धोरणाला स्थगिती द्या, अन्यथा लोकसभा निवडणुकीवर सहकुटुंब बहिष्कार टाकू, असा इशारा रत्नागिरी जिल्हा प्रवासी रिक्षा चालक मालक संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिला आहे. www.konkantoday.com