नेत्रावतीतून रेल्वेतून पडून तरूण जखमी, ओळख पटविण्याचे आवाहन
कोकण रेल्वे मार्गावरील नेत्रावती एक्सप्रेस गाडीतून पडून तरूण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना भोके रेल्वे स्टेशन येथे घडली. जखमी तरूणाला रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्ययात आले आहे. अद्याप या तरूणाची ओळख पटली नसून घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.जखमी तरूण हा २६ एप्रिल रोजी मुंबईकडे जाणार्या नेत्रावती एक्सप्रेस गाडीने प्रवास करत होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गाडी भोके रेल्वेस्टेशन येथे आली असता तोल जावून खाली पडला. जखमी अवस्थेत त्याला पोलिसांच्या मदतीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.www.konkantoday.com