
नुकसान झालेल्या शेतकर्यांची ई-केवायसी अभावी नुकसान भरपाई रखडली
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने दापोली तालुक्यातील २७४ शेतकर्यांचे नुकसान झाले होते. याबाबतचे पंचनामेही झाले आहेत. परंतु सहा महिन्यांपासून ईकेवायसी करण्यात आलेली नसल्याने नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात भरपाई जमा झालेली नाही. यातील केवळ चार शेतकर्यांनी ई-केवायसी केल्याचे दापोली कृषी विभाग, तहसीलदार कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यामध्ये भातशेती, नाचणी अथवा इतर पिकांची कापणी सुरू असते. अशातच नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने दापोली तालुक्यातील २४७ शेतकर्यांचे नुकसान झाले. www.konkantoday.com