
चिपळूण येथील बसस्थानकाच्या कामाला वेग
हायटेक धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा पाया काही दिवसांपूर्वी पूर्णत्वास गेला आहे. असे असताना सद्यस्थितीत इमारतीचा पहिला स्लॅब ओतला जात असून तब्बल ६ वर्षानंतर सुरू असलेल्या स्लॅब कामाने कमालीचा वेग धरला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हायटेक बसस्थानकाच्या कामाने वेग घेतल्याचे पाहून प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. यामुळे चिपळूणवासियांचे हायटेक बसस्थानकाचे स्वप्न लवकरच सत्यात उतरण्याच्या आशा पुन्हा एकदा जिवंत झाल्या आहेत.मध्यवर्ती बसस्थानकाची जीर्ण इमारत तोडून त्या ठिकाणी हायटेक धर्तीवर अत्याधुनिक स्वरूपाचे बसस्थानक उभारण्यास सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीपासून या बसस्थानकाच्या कामात अनेक अडचणींनी खो घातला. यामुळे प्रत्यक्ष बांधकाम संथगतीने सुरू झाल्याने कित्येक वर्षे बसस्थानक इमारतीचा पाया देखील पूर्णत्वास गेला नव्हता. या जुन्या बसस्थानकाची इमारत पाडल्यापासून नव्या हायटेक बसस्थानकाचे स्वप्न चिपळूणवासिय उराशी बाळगून आहेत. www.konkantoday.com