चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथे विद्युत गोडावून फोडून ३४ हजारांच्या साहित्याची चोरी
चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथे असलेले विद्युत परीक्षण गोडावून फोडून अज्ञात चोरट्याने ३४ हजार ८०० रुपये किंमतीच्या विद्युत साहित्याची चोरी केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद विजया प्रशांत भोसले (सती-चिंचघरी) यांनी दिली.www.konkantoday.com