घनकचरा संकलन देखरेखीसाठी राजापुरात आयसीटी प्रणाली वापरण्यात येणार
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत दैनंदिन घनकचरा संकलनावर देखरेख ठेवण्यासाठी राजापूर शहरात आयसीटी आधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ओला व सुका कचरा साठवण्यासाठी वापरण्यात येणार्याा डस्टबिनवर विशिष्ट कोड लावण्यात येणार आहेत. पालिकेच्या कर्मचार्यांनी कचरा संकलन केल्यानंतर कोड स्कॅन केला जाणार आहे. या प्रणालीमुळे कोण कचरा देतो आणि कोण देत नाही, हे समजणार आहे. कचरा न देणार्या नागरिकांवर कारवाई करणे सुलभ होणार आहे.www.konkantoday.com