
लांज्याजवळ दुचाकी व बोलेरो अपघातात तीन जण जखमी
लांजा तालुक्यातील बापेरे गुरववाडी येथेदुचाकी व बोलेरो गाडीमध्ये धडक होऊन बापेरे येथील दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघेजण किरकोळ जखमी झाले.
बापेरे गुरववाडी येथील अरुण गणपत गुरव (३५) हे दुचाकी बजाज डिस्कव्हर (एमएच ०८, सीवाय ६१०९), पत्नी आर्या अरुण गुरव (३०), मुलगा अर्णव अरुण गुरव (७) मुलगी आराध्या अरुण गुरव (५) यांना घेऊन बापेरे ते लांजा असे दुचाकीवरून निघाले हाेते. बापेरे गुरववाडी येथे १० वाजण्याच्या दरम्यान ते आले असता लांजाहून बापेरे येथे रूपेश शांताराम गुरव (३२, रा. इसवली) हे बोलेरो गाडी (एमएच ०४, एफयु २७०८) बापेरे येथे घेऊन जात हाेते.त्याचवेळी बोलेरो गाडीच्या उजव्या बाजूच्या हाैद्यावर येऊन दुचाकीची धडक बसली व अपघात घडला यामधील दुचाकीवरील तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत
www.konkantoday.com