रत्नागिरी शहरात रेगे कंपाऊंड जवळ वृद्धाचा खून झाल्याने खळबळ
रत्नागिरी शहरातील गवळीवाडा कडे जाणाऱ्या रस्त्या जवळील रेगे कंपाऊंडमध्ये वॉचमन चे काम करणाऱ्या वृद्धाचा डोक्यात कठीण वस्तूने मारून खून करण्याची घटना घडली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून गवळीवाडा कडे जाणाऱ्या रोड लगत असणाऱ्या जुन्या रेगे कंपाऊंड मध्ये एकाचा मृतदेह मिळून आला. अशोक वाडेकर असे या प्रौढाचे नाव असल्याचे समजते. ही घटना नेमकी कधी घडली. हे स्पष्ट झालेले नाही. मृत व्यक्ती ही कंपाउंड समोरील इमारतीमध्ये वॉचमन म्हणून कामाला होती. या इमारती नजीक राहत होती त्यांचा खून नेमका कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचा शोध पोलीस घेत आहेत दरम्याने याप्रकरणी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे
www.konkantoday.com