
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
अवघ्या महाराष्ट्राची मान आपल्या कर्तृत्वानं आणि परिश्रमानं उंचावणाऱ्या दोन शिक्षकांना यंदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.यंदा देशात ५ ते १७सप्टेंबर दरम्यान शिक्षक पर्व साजरं केलं जाणार आहे. त्या अनुषंगानं देशभरातील तब्बल ४४ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा समवेश आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील अस्रल्ली गावाच्या श्री खुर्शीद कुतुबुद्दीन शेख या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाचा समावेश आहे.
तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कडोर या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री उमेश रघुनाथ खोसे यांनाही राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार सन्मान देशभरातून निवड झालेल्या या ४४ शिक्षकांपैकी ५ शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजेच ५ सप्टेंबरला करण्यात येणार आहे
www.konkantoday.com