
रत्नागिरी शहरातील पटवणे भागातील मतदार केंद्राकडे जाणारा रस्ता दुरुस्त करा तरच मतदान अन्यथा बहिष्कार
. रत्नागिरी नगर परिषद वीर सावरकर नगर परिषद शाळा क्रमांक पाच पटवणे या शाळेमध्ये रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची तीन मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत या तिन्ही मतदान केंद्रात एकूण तीन हजार पाचशे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत या मतदारांमध्ये वयोवृद्ध अंध व अपंग मतदार आहेत मात्र या मतदान केंद्राकडे जाणारा रस्ता हा पटवणे साई मंदिर ते नगरपरिषद शाळा असा असून गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये विविध कामासाठी खोदकाम करून रस्ता वापरण्यास अयोग्य झालेला आहे या रस्त्यावरून मतदारांना चालत जाणे सुद्धा अशक्य आहे त्यामुळे या मतदान केंद्राकडे जाणारा हा एकमेव शासकीय रस्ता आहे अन्य कोणताही रस्ता नाही त्यामुळे या रस्त्याची पाहणी करून तात्काळ मतदानापूर्वी दुरुस्ती करावी अन्यथा या भागातील ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे लेखी पत्र परटवणे भागातील ग्रामस्थांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेwww.konkantoday.com