रत्नागिरीतील प्रसिद्ध रांगोळी कलाकार राहुल कळंबटेंच्या थ्रीडी रांगोळीला राजस्थानमध्येही ठसा
इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड असे थ्रीडी रांगोळीमध्ये जागतिक विक्रम करणार्या रत्नागिरीचे नामवंत रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी आणखीन एका स्पर्धेत ठसा उमटवला आहे. राजस्थान येथे झालेल्या ऑल इंडिया ऑनलाईन आर्ट कॉम्पिटिशनमध्ये कळंबटे यांनी देशात चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला आहे.नुकतीच ही स्पर्धा राजस्थान येथे पार पडली. या स्पर्धेत त्यांनी एका लहान बालिकेची थ्रीडी रांगोळी सादर केली होती. पांढर्या रंगाच्या टाईल्सवर काढून रांगोळीचे रंग वापरून ही रांगोळी काढण्यात आली. अनेक वर्षे राहुल हे विविध रांगोळ्या काळत आहेत. जगातील सर्वात लहान रांगोळी म्हणून आशिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांच्या रांगोळीला मान्यता दिली होती. फक्त ६ सेंटीमीटरच्या थ्रडी रांगोळीची दखल घेण्यात आली होती. जिल्हा, राज्य, राष्ट्रीयस्तरावरील अनेक स्पर्धांमधून सहभाग नोंदवत बक्षिसे प्राप्त केली आहेत. सध्याच्या घडीला त्यांनी ३ जागतिक विक्रमांवर शिक्कामोर्तब केला आहे. यामध्ये इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांनी आापले नाव कोरले आहे. सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठ आयोजित पहिल्या राज्यस्तरीय थ्रीडी रंगावली स्पर्धेत २०१९ मध्ये येथील कलाशिक्षक व युवा रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. www.konkantoday.com