
खेड शहरातील ज्वेलर दुकानात चार महिलांच्या टोळीने ग्राहक बनून सोन्याचे मंगळसूत्र केले लंपास
खेड शहरातील निवास तळ भागात असलेल्या प्रसिद्ध ऋषभ ज्वेलर्समध्ये बुधवारी धक्कादायक चोरीची घटना घडली. ग्राहकाच्या वेशात आलेल्या चार महिलांच्या टोळीने दागिने पाहण्याच्या बहाण्याने सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने लंपास केले. या संपूर्ण प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेजमधून उलगडा झाला असून पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार चार महिलांचा गट ग्राहक बनून दागिने पाहण्यासाठी दुकानात दाखल झाला.
दागिन्यांच निवड करताना त्यातील एका महिलेने अंदाजे २.५ ते ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र मणी (किंमत सुमारे २५ ते ३० हजार रुपये) हातात घेतले. क्षणातच तिने ते मगळसूत्र हातात ठेवून सरळ दुकानाबाहेर पळ काढला. तिच्या पाठिमागे इतर तीन महिलांनीही पळ काढला. सीसीटीव्हीत कैद झालेला प्रकार अचानक घडलल्या या घटनेने दुकानदार व कर्मचारी काही क्षण गोंधळले. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे चित्रित झाला असून त्यावरून पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. खेड-दापोली परिसरात याआधी महिलांकडून अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
www.konkantoday.com




