पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपची उज्जल निकम यांना उमेदवारी
* लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीचा मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील उमेदवार ठरला आहे. भाजपनं विद्यमान खासदार पूनम महाजन याचं तिकीट कापलं आहे.पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपनं उज्जल निकम यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे भाजपन विद्यमान खासदार पूनम महाजन यांना मोठा धक्का दिला आहे. उत्तम मध्य मुंबईच्या जागेसाठी उज्जल निकम आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, माधुरी दीक्षितने निवडणूक लढण्यास नकार दिल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी जाहिर केली आहे.www.konkantoday.com