ठाकरे ब्रँड टिकवण्याची, वाढवण्याची ही निवडणूक -वरूण सरदेसाई
ठाकरे ब्रँड टिकवण्याची, वाढवण्याची ही निवडणूक आहे. ज्या लोकांना ठाकरे ब्रँड संपला असे वाटते त्यांना हे स्पष्ट संदेश देण्याची ही लोकसभा निवडणूक आहे. जोपर्यंत कोकणातला शिवसेनाप्रेमी जागा आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून, देशातून ठाकरे ब्रँड कोणीही संपवू शकणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन युवासेना, शिवसेना सचिव वरूण सरदेसाई यांनी व्यक्त केले.महाविकास आघाडीच्या रत्नागिरीतील नाचणे जिल्हा परिषद गटामध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकाारी उपस्थित होते. येत्या ७ मे रोजी मशाल बटण दाबायचे असल्याचे आवाहनही वरूण सरदेसाई यांनी केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात गेल्या १० वर्षापाासून खासदार विनायक राऊत यांनी जे काम केले आहे त्याचा लेखाजोखा मी, त्यांनी मांडल्याचे सांगितले. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. त्यानंतर मुंबईपासून महाराष्ट्र आणि देशभर ती पसरली. त्याचे मूळ कारण होते ते रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिक. आज पक्षात फूट पडल्यानंतर मुंबईत शिवसेना अबाधित राहिली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक होईल, यावेळी पहिल्यापेक्षाही जास्त नगरसेवक निवडून येतील. यामध्ये खूप मोठा वाटा रत्नागिरी जिल्ह्याचा असेल. www.konkantoday.com