आपण शिवसेनेशी निष्ठावंत -माजी आमदार गणपत कदम

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. गद्दारी आमच्या रक्तात नाही. मुंबईतून येत असताना गाडीचा अपघात झाल्यानंतर प्रकृतीची चौकशी करण्यासाठी नारायण राणे घरी आले होते. माझ्या राजकीय प्रवासात राणे यांनी शिवसेनेत असताना मदत केली होती. त्याबद्दल या भेटीत कृतज्ञता व्यक्त केली. त्याचवेळी निवडणुकीत मी तुम्हाला कोणतीही मदत करणार नाही, असेही सांगितले. मात्र माझ्या बोलण्याचा विपर्यास करून काही खोडसाळ बातम्या पसरवल्या आहेत. असे सांगताना मी शिवसेनेशी एकनिष्ठ असून महाविकास आघाडीचे उमेदवार व खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारामध्ये सक्रीय असल्याचा खुलासा माजी आमदार गणपत कदम यांनी केला.महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी २ दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी आमदार गणपत कदम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button