अनेक दिवस रखडलेले अंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात अखेर मानधन जमा

गेले अनेक दिवस रखडलेले मार्च महिन्याचे मानधन अखेर अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा झाले आहे. ते व्हावे यासाठी कर्मचारी संघटनेने काही दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनाची शासनाने दखल घेत ही कार्यवाही केली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यांचे मानधन वेळेत देण्याची मागणी होत आहे.गावातील वाडीवस्त्यांवर असलेल्या अंगणवाडी केंद्रात बालकांवर संस्कार करण्यासह गरोदर, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करीत असतात. त्यातच शासन या कर्मचार्‍यांवर विविध कामे लादते. निवडणूक प्रशिक्षकण, आरोग्याची कामे सोपविली जातात. मात्रत्र त्यांचे मानधन वेळेत देण्याबाबत कायमच उदासीनता दाखवली जाते. एप्रिल महिना संपत आला तरी मार्च महिन्याचे मानधन मिळाले नव्हते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button