
अटल बांबू समृद्धी योजनेत रत्नागिरी जिल्ह्याला २०० हेक्टरचे उद्दिष्ट
राज्य शासनाने मंजूर केलेल्या अटल बांबू समृद्धी योजनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्याला २०० हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट असून शेतकरी, संस्था, समूहगट यांनी या योजनेचा लाभ घेवून पावसाळ्यात बांबू लागवड करावी, असे आवाहन नागपूर येथील महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे समन्वयक अजित भोसले यांनी केले आहे.सन २०२४ मध्ये पावसाळ्यात शेतजमिनीत बांबू लागवड करण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी १००० हेक्टरचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. सर्व साधारणपणे प्रत्येक जिल्ह्याला २०० हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट आहे. एखाद्या जिल्ह्याचे उद्दिष्ट साध्य न झाल्याने निदर्शनास आल्यास हे उद्दिष्ट जास्त मागणी असणार्या जिल्ह्यांना देण्यात येणार आहे.www.konkantoday.com