
राज्यात आणखी आठ जणांना ‘ओमायक्रॉन’ची लागण; बाधितांची संख्या पोहचली २८ वर
संपूर्ण जगात दहशत पसरवणाऱ्या करोनाच्या नव्या व्हेरियंटने म्हणजेच ओमायक्रॉनने आता हळूहळू देशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. आज राज्यात आठ नवीन ओमायक्रॉनबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या २८ वर पोहचली आहे.
राज्यात मंगळवारी आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधितांमध्ये मुंबईत सात जण तर वसई-विरारमधील एका रूग्णाचा समावेश आहे. तर, आतापर्यंत राज्यभरात आढळून आलेल्या २८ ओमायक्रॉन बाधितांपैकी ९ रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयामधून सुट्टी देखील मिळालेली आहे.
www.konkantoday.com