शिवाजीनगर बस स्थानकातील कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू, प्रवाशांची धुरळ्यातून होणार सुटका
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शिवाजीनगर बस स्थानकातील प्रवाशांची आता धुरळ्यापासून सुटका होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत या बस स्थानक परिसरात कॉंक्रीटीकरण व गटारांचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यात हे काम मार्गी लावण्याच्या हालचाली ठेकेदार कंपनीकडून सुरू आहेत. या कामांसाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.चिपळुणातील शिवाजीनगर बस स्थानक हे महामार्गावरील प्रमुख स्थानक आहे. या बस स्थानकात प्रवाशांची कायम वर्दळ असते. विद्यार्थी वर्गासाठीही हे स्थानक फायदेशीर ठरत आहे. या बस स्थानकाचा परिसर विस्तीर्ण आहे. सुरूवातीच्या काळात येथे करण्यात आलेले खडीकरण पूर्णतः उखडले होते. त्यानंतर काही वर्षांनी शहरातील नद्यांमधून काढण्यात आलेला गाळ या बसस्थानकाच्या आवारात डम्प करण्यात आला होता. त्यातच आरटीओने पकडलेली वाहने सुरद्धा येथेच ठेवण्यात आली आहेत. ही वाहने सध्या सडत आहेत. मातीचा भराव आणि सडत पडलेली वाहने यांनी हा परिसर व्यापून टाकला होता. www.konkantoday.com