
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणार्या 68 कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस.
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे कामकाज रामभरोसे झाले आहे. या ठिकाणी काही कर्मचारी जीव तोडून काम करतात. तर काही केवळ पाट्या टाकण्याचे काम करत असतात. यात सामान्याची कामे अडकतात. या सर्वांवर चाप बसून जिल्हा परिषदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.याचाच एक भाग म्हणून कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणार्या 68 कर्मचार्यांना त्यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावली आहे. या कारवाईने कर्मचार्यात खळबळ उडाली आहे.जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर हे कार्यालयीन कामात कठोर असून, त्यांनी बेशिस्त जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे




