
वणव्यांपासून शेतकर्यांचे मोठे नुकसान, सरकारी यंत्रणांकडून दुर्लक्ष
कोकणात खास करून रत्नागिरी जिल्ह्यात वणवे लागून शेतकर्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होते. शेतकर्यांच्या जीवापाड जपलेल्या आंबा, काजूच्या बागा वणव्याच्या आगीत भस्मसात होतात. मात्र शासनाचे गोरगरीबांच्या या ज्वलंप समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. सरकारकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही. कागदोपत्री फक्त पंचनामे केले जातात. कित्येक ठिकाणी वणवे लागल्यावर पंचनामा करण्यासाठी वनअधिकाारी त्या ठिकाणी पोहचतही नाहीत. अशी खंत व्यक्त केली जात आहे.उन्हाळी हंगामात दररोज कोकणात कुठे ना कुठे रोज एक वणवा, अशी भयावह स्थिती आहे. या वणव्यांनी उजाडणार्या डोंगरामुळे सर्वत्र निसर्गसौंदर्याला, हिरवळीला हानी पोहोचून अनेकांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. www.konkantoday.com