राणेंचा प्रचार करण्यासाठी महिलावर्गाने कामाला लागावे, निलमताई राणे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणेंनाच उमेदवारी मिळणार हे विधिलिखित होते. त्यामुळे आधीपासूनच प्रचार सुरू केला होता. मतदारसंघ मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक घरात राणेंचा प्रचार करण्यासाठी महिलावर्गाला आता कामाला लागायला हवे. जिल्ह्यातील महिला स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर बनविण्याचे आमचे व्हिजन आहे. तुम्ही आशिर्वाद द्या, असे आवाहन नीलम राणे यांनी वेंगुर्ले येथे केले.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी येथील स्वामीनी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. www.konkantoday.com