
राजापुरात पाणी टंचाई मात्र राजापूर पंचायत समितीचा टँकर चार वर्षे लांजात
दिवसेंदिवस वाढणार्या तापमानामुळे जलस्त्रोत आटू लागले असून तालुक्याला हळुहळू टंचाईचे टके बसू लागले आहेत. सद्यस्थितीत चार वाड्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र सुमारे पाच वर्षापूर्वी लांजा तालुक्याला दिलेला टँकर अद्यापही राजापूर पंचायत समितीच्या ताब्यात न मिळाल्याने तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना पंचायत समितीला अडचणींचा सामना करावा लागणार आहे.राजापूर पंचायत समितीकडे एक शासकीय मालकीचा टँकर आहे. मात्र दरवर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या पाहता एक टँकर अपुरा पडत असल्याने प्रशासनाला खासगी टँकर अधिग्रहीत करावे लागत होते. मात्र शासनाकडून खासगी टँकर मालकांना अत्यल्प भाडे मिळत असल्याने व तेही वेळेत मिळत नसल्याने खासगी टँकर मालक प्रशासनाला वाहन देण्यास टाळाटाळ करत असल्याचे वास्तव आहे. अशातच पाच वर्षापूर्वी राजापूर पंचायत समितीचा शासकीय टँकर लांजा तालुक्यासाठी देण्यात आला होता. तो आजपर्यंत राजापूर पंचायत समितीला प्राप्त न झाल्याने गेली तीन-चार वर्षे टंचाईग्रस्त गावांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.www.konkantoday.com